भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रल्हादादिकांचें अंतरीचें ध्यान । तें पंढरीये निधान उभें असे

pralhadadikanchen antarichen dhyan | ten pandhariye nidhan ubhen ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रल्हादादिकांचें अंतरीचें ध्यान । तें पंढरीये निधान उभें असे ॥१॥ सर्व जन जया नेणते जाहले । सुख दाखविलें पुंडलीका ॥२॥ वेदांचें जें सार श्रुतींचें जिव्हार । तेंचि कटीं कर उभें असे ॥३॥ ज्ञानाचें जीवन वैराग्या भूषण । तें सुख नि-ध न विटेवरी ॥४॥ शुद्ध बुद्ध मुक्त समाधीचें सुख । तें उभें प्रत्यक्ष वाळंवटीं ॥५॥ ह्लदयीं धरूनि नामा निजबोधें निमाला । शिण हारपाला संसाराचा ॥६॥