भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रसाद तुमचा लाधलों आतां । झालों कृतकृत्यता सनाथ

prasad tumacha ladhalon atan | jhalon krutakrutyata sanath

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्रसाद तुमचा लाधलों आतां । झालों कृतकृत्यता सनाथ ॥१॥ पुरविला जीवींचा हेत । होतो चिंतीत मानसीं तो ॥२॥ कृपा करुनियां दाविला देवा । आपुला ठेवा उघडुनी ॥३॥ निळा म्हणे सद्गुरुनाथा । गाऊं आतां ओंविया गीतीं ॥४॥