भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राण जाये प्रेत न बोले

pran jaye pret na bole

प्राण जाये प्रेत न बोले चित्रीचे लेप न हाले । तैसें दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी वो करी हे शब्दची वाउगे ठेले रया ॥१॥ आतां आपणया आपणचि विचारी । शेखीं प्रकृति ना पुरुष निर्धारी ॥२॥ आतां प्रेताचे अळंकार सोहळुले । कां शब्दज्ञानें जे डौरले दीपने देखती कांहीं केलें । ऐसे जाणोनिया सिण मनी तीं प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठल देखतांचि जे बोधले । ते तेणें सुखें होऊनी सर्वात्मक जे असतांचि देहीं विस्तारलें । येणें निवृत्तिरायें खुणा दाउनी सकळ । बोलतां सिण झणे होईल रया ॥४॥