भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॐ नमो शिवा आदि । कावडि घेतली खांदी मिळाली संतमांदी । त्याचे रज रेणु वंदी ॥ध्रु

om namo shiva adi | kavadi ghetali khandi milali santamandi | tyache raj renu vandi ||dhru

ॐ नमो शिवा आदि । कावडि घेतली खांदी मिळाली संतमांदी । त्याचे रज रेणु वंदी ॥ध्रु०॥ शिवनाम शीतळ मुखीं । सेविं पां कापडियारे दडदडदडदड दुडुदुडुदुडुदुडु । पळ सुटला कळिकाळा बापुडीयारे ॥१॥ गुरुलिंग जंगम । त्यानें दाविला आगम । अधिव्याधि झाली सम । तेणें पावलों विश्रामरे ॥२॥ जवळीं असतां जगजीवन । कां धांडोळिसी वन । एकाग्र करी मन । तेणें होईल समाधानरे ॥३॥ देहभाव जेथं विरे । ते साधन दिधलें पुरे । बापरखुमादेविवरे विठठलुरे विठ्ठलुरे विठ्ठलुरे ॥४॥