भजनी मालिका

भजने

पोर निर्दय जालें देवपिसेंज लागलें । लोकाचें गोविलें तेंहिअ पोर ॥१॥ नित्य करी अंघोळी धोत्रेंहि फाडिलीं । कळी मांडियेली याही पोरें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रकाश तरणी न बोले वेदवाणी । बोध विवेक दोन्ही तटस्थ झालीं ॥१॥ वेदासी अगोचर ध्यानासी कानडें । तें ब्रह्मा सांपडें सदगुरु चरणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥१॥ बीज तें चि फळ येईल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठी एकें जैसे तैसे ॥१॥ आगळें पाऊल आणिकांसी तारी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रताप तुमचा आहेचि जैसा । करितां जी तैसा बडिवारही ॥१॥ नव्हे जें कोणा तें करुनी दावितां । अघटित घडवितां निमिष्यमात्रे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा