भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोसणाचि परी आवडला

posanachi pari avadala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पोसणाचि परी आवडला । मानु दिधला पुत्रपणा ॥१॥ मागें पुढें सांभाळिती । त्याचेंचि करिती कोड सदां ॥२॥ खांदी कडिये घेउनी सुखें । बोलों हरिखें शिकविती ॥३॥ निळा म्हणे ऐसे लोक । वानिती कौतुक परस्परें ॥४॥