भजनी मालिका

भजने

पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥१॥ तैसी माझ्या मना परी झाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥ देव म्हणे गोपाळ धन्य तुम्हीं बळी । पळविला बळी बाऊ तुम्हीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पेहरंब्याचे सोई गे सारविसी भुई । परि येथें तेथें असे अवघाचि हरि पाही ॥१॥ कापवितां हात जरी सावधान चित्त । तरीच होईल मान न पवतां घातपात ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥ अवघें लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥१॥ धांव रे हरी सांपडलों संधी । वोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पैल गरुडाचे वारिकें । गगनीं कृष्ण येतां देखे ॥१॥ दुडवा दुडवी हरि धांवतु । नाभीं नामयातें म्हणतु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पैल गोल्हाटमंडळ तो । त्रिकुटा वेगळा तो गे बाई ॥१॥ सहजबोधीं अनुभव तो । परमतत्त्वीं अनुराग तो गे बाई ॥ध्रु०॥

पैल ते पंढरी पैल ते पंढरी । पांढरीवरी काळी वस-विली ॥१॥ सोंवळें हें ब्रह्म सुनिळ हें ब्रह्म । विद्युल्लता ब्रह्म पाहूं चला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥ काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बीलीं साजिरीं मोरवीसें । हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

पैल सुखाचेनि माये सुकाळु । नवल पाहिजे हो गोपाळु । म्हणोनि योगयाग तप साधन । व्रत दान उद्यापन । पंचाग्नि गोरांजन अनुष्ठान । परि पद निर्वाण नकळें हें ॥१॥