भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बीलीं साजिरीं मोरवीसें

pail sanvalen tej punjal kaisen | sirin turbilin sajirin moravisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बीलीं साजिरीं मोरवीसें । हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥ जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥२॥ असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती तेहतीस कोटि तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥३॥ कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली दैवांची । जया चिंतितां अग्नी हा शांति नीवे। धरावा मानसीं आपल्या दृढभावे ॥४॥ मुनी देखतां मूख हें चित्त माये । देह मांडला भाव हा बापमाय । तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥५॥