भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें

pail pahaho parabrahma bhulalen | jagadish kanho paratantra jhalen

रचनाकार: संत सावता · अभंग
पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥ काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥ आदि अंतू नाहीं जया व्यापका । माया उखळी बांधिला देखा ॥ ३ ॥ सर्व सुखाचें सुख निर्मळ । कैसें दिसताहे श्रीमुखकमळ ॥ ४ ॥ योगियां ह्रदयमकळींचें हें निधान । दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ॥ ५ ॥ सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा । तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥ ६ ॥