भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें

aikave viththal dhure | vinanti majhi ho satvaren

रचनाकार: संत सावता · अभंग
ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥ करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥ कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३ ॥ माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥