भजनी मालिका

भजने

पूर्व पुण्य माझें फळोन्मुख जालें । प्रत्यक्ष भेटले पांडुरंग ॥१॥ संसारीं आसक्त मायामोहें रत । तापत्रयीं संतप्त जाले जीव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पूर्व संबंधें मज दिधलें बापानें । शेखी काय जाणें कैसे झालें ॥१॥ प्रसुतालागीं मज आणिलें कल्याणा । अंतरला राणा पंढरीचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं । तरीच पंढरी वास घडे ॥१॥ कोटी यज्ञफळ भीमरथी पाहतां । मोक्ष सायुज्यता ततक्षणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पूर्वजज्मीं त्यानें साधियेला योग । कांहींसा वियोग झाला होता ॥१॥ कैसा नेटेपाटे उन्मखे फुटला बालपणीं त्याला ज्ञाम झालें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पूर्वजन्मीं आराधितां । तुझें वर्म आलें आमुच्या हातां । नामदेवें सांगितलें जातां । तें सर्वथा देईंजे ॥१॥ आमुचे वडिलीं गा जोडिले । तें तुझे पायीं गा ठेविलें । गौप्य करितो नोव्हे गा भलें । दे उगलें गा दातारा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पूर्वसंबंधें मज दिधलें बापानें शेखी काय जाणें कैसें जालें ॥१॥ प्रमुतीलागी मज आणिलें कल्याणा। अंतरला राणा पंढरीचा ॥२॥

रचनाकार: संत लाडाई

पूर्वार्जित होतें पुण्य । तेणें हे चरण आतुडलों ॥१॥ आतां सुखा नाहीं उणें । इहलोकीं भोगणें परत्रींचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पूर्वीं काय तप नेणें पैं हो केलें । निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥ येऊनियां देव दळूं लागे अंगें । रखुमाईचा संग दूर केला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पूर्वी काय तप नेणें में हो केलें निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥ येऊनियां देव दळू लागे अंगे। रखुमाईचा संग दूर केला ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

पूर्वी जो प्रल्हाद तोचि जाणा अंगद । तोचि उध्दव प्रसिध्द कृष्णावतारीं ॥१॥ कलीमाजीं जाणा नामदेव म्हणती । लडिवाळ श्रीपति लळा पाळी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पूर्वीं तुझी कांहीं केली होती सेवा । उपयोगा देवा आली आजी ॥१॥ अनंता जन्मींचें फळलें अनुष्ठान । पाहिले चरण विठो तुझे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव