भजनी मालिका

भजने

पुर्वीचिया मतांतरा । सांपडला बरा आम्हां मार्ग ॥१॥ नाहीं कोठें गोंवा गुंतीं । ऐसें गर्जती हरिदास ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पुंलिकाकारणें वाळुवंटीं उभा । भक्ताच्या कैवारें दिसतसे शोभा ॥१॥ पुढें चंद्रभागा वाहे अमृतमय । आषाढी कार्तिक वैष्णवांची दाटी होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पुशुमुखें वेदाच्या श्रुती । पढवा कीर्ती तुमचिये ॥१॥ अचेतन भिंती चालवणें । हेंही कारणें विचित्र ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पुष्करिणीकांठीं वैष्णवांचे भार । देव ऋषीश्वर जेवताती ॥१॥ अवघिया पात्रें वाढलीं नारायणें । सोडिती पारणें निवृत्तिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुष्पासी परिमळु दूध घृत मेळु । ऊंस तो रसाळु बीज नाहीं ॥१॥ तैसें परब्रह्म आहे तें निर्वाण । वर्णितां पुराण नपडे ठायी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥१॥ कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुसताती संत सांगा देवा मातें । पूर्वीं येथें होतें कोण क्षेत्र ॥१॥ देव म्हणे स्थळ सिद्ध हें अनादि । येथेंच समाधि ज्ञानदेवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुसावें तें ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥ येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुसे क्षेम भक्तांलागीं । म्हणतसे मार्गी श्रमलेती ॥१॥ प्रतिवरुषीं भेटी देतां । सांभाळितां येउनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पूजा करूं तरी पूजे नाहीं ठाव । भाव धरूं तरी देवचि देव ॥१॥ करुं तरी पूजा कवणाचि सांगा । देवाविण जागा रिती कोण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ