भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजा करुं कैशी देवा । वाचे आठवुं केशवा

puja karun kaishi deva | vache athavun keshava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूजा करुं कैशी देवा । वाचे आठवुं केशवा ॥१॥ हेचि माझी पूजाविधी । सर्व टाकिली उपाधी ॥२॥ घालूनि निर्मळ आसन । पूजुं संतांचें चरण ॥३॥ दृढ करूं भाव साचा । सदा छंद रामनामाचा ॥४॥ एका जनार्दनीं पूजा । सर्वभावें गरुडध्वजा ॥५॥