भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई

pusatase sanga mi hen majhen aisen kai | rusun naka nugave to jhave apuli ai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥१॥ कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥ध्रु.॥ सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें जीवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥२॥ तुका म्हणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥३॥