भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंलिकाकारणें वाळुवंटीं उभा । भक्ताच्या कैवारें दिसतसे शोभा

punlikakaranen valuvantin ubha | bhaktachya kaivaren disatase shobha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुंलिकाकारणें वाळुवंटीं उभा । भक्ताच्या कैवारें दिसतसे शोभा ॥१॥ पुढें चंद्रभागा वाहे अमृतमय । आषाढी कार्तिक वैष्णवांची दाटी होय ॥२॥ एका जनार्दनीं जया वैष्णव गाती । विठ्ठलनाम उच्चारितां सायुज्यमुक्ति ॥३॥