भजनी मालिका

भजने

पुढें तो भिकारी जाता झाला वेगें । आपुलिया रंगें रंगूनियां ॥१॥ येकाकार करी चित्त आणि वृत्ति । पाहे लक्ष्मीपति दुरोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥ एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥ सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥ आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदटलें पुढें । परब्रम्ह सावळें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥ जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुण्यपावन त्यांची वाणी । जगदोध्दचरणीं प्रवर्तली ॥१॥ सव्दिवेक अमृतपूर । चालती उदगार वाचे ते ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पुण्यभूमी आळंकावती। प्रत्यक्ष नांदे कैलासपती। आणि सिद्ध साधकां वस्ती । ब्रह्मा अमरपती आदिकरुनी ॥ १॥ ऐका अळंकापुरीची मात । स्वयें वर्णीत श्रीभगवंत । उपमेसि न पुरे निश्चित । वैकुंठ आदिकरुनी ॥२॥

रचनाकार: संत सेना

पुण्यभूमी गंगातीरीं । धरी अवतार त्रिपुरारी। नाम त्रिंबक निर्धारी । मागें ब्रह्मगिरी शोभत ॥१ ॥ पार्वतीसी सांगे कैलासराणा । येथे नांदेल निवृत्ति निधान। त्याचेनि ठाव हा पुण्यपावन । जीवा उद्धरण म्हणता निवृत्ती ॥२॥

रचनाकार: संत सेना

पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश । श्रीहरीची विशेष भक्ति जेथें ॥१॥ जाणोनियां इंद्र पाठवी विमान । आणवी सुमनें कांतीयेची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥

रचनाकार: संत जनाबाई

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला दरिद्री तो भाग्यवंत केला। धुंद झाला तुझा दरबार।।ध्रु।। चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ।। १ ।।

रचनाकार: संत जनाबाई

पुण्यवंता दावी बाळलीला देव । पालथा केशव पड-तसे ॥१॥ नंदें उत्साहासीं केलें तेव्हां फार । दिधलें अपार द्रव्य द्विजां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥ आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम