भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी

punya paraupakar pap te parapida | anik nahin joda duja yasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥ सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥ गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥ संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥ तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥४॥