भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला

punyavant patal lokin nela | daridri to bhagyavant kela

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥ धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥ वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी । सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥ पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली । कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्‍ट बरी नाहीं केली ॥३॥ सत्त्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ । सखा म्हणविसी त्याचें नासी बळ । जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥