भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंडित ध्यानीं। पांडुरंग जपे वाणी

akhandit dhyanin| pandurang jape vani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अखंडित ध्यानीं। पांडुरंग जपे वाणी ।।१।। पांडुरंग नाम जप हेंचि माझें महा तप ||२|| ऐसें आलें प्रत्ययासी सहज तेणें तत्त्वमसी।।३।। पावलिया हो स्वपद। सहज बिराला तो शब्द ||४|| संदेह अवघाचि फिरला । जनी म्हणे उदयो झाला ॥५॥