भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें जाणवेल हें पहातां । अंगा येतां क्षीणत्व

pudhen janavel hen pahatan | anga yetan kshinatva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुढें जाणवेल हें पहातां । अंगा येतां क्षीणत्व ॥१॥ मग तो नलगे कांहीं हाती । होईल माती आयुष्या ॥२॥ म्हणोनियां करा वेग । धरा अनुराग हरिभजनीं ॥३॥ निळा म्हणे पुढिल वेळ । आहे अति काळ कठिण तो ॥४॥