भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें

punya ubhen raho atan | santachen yakaranen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥१॥ पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥ संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥२॥ तुका म्हणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥३॥