भजनी मालिका

भजने

पुत्राचिया ओढी बाप करी जोडी । वाळवुनि कुरवंडी आपणा करी ॥१॥ मिरासीचा धनी करुनी ठेविला। भार तो वाहिला कडिये खांदी ॥२॥

रचनाकार: संत सेना

पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुन्हां पेहरंब्याच्या सुखें गे गाई हरिमुखें । वाजवुनी टाळी रंगीनाचोनी हरिखें ॥१॥ देईल तोचि पानें गे गौरवुनी मानें । खोबरियाच्या वाटया माळा गळांचीं सुमनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पुराणिक म्हणविती । जाणोनी कांदे ते भक्षिती ॥१॥ अगस्तीचे मुत्र मळ । लावूनी म्हणती कृष्णावळ ॥ध्रु.॥ श्रेष्ठ वर्ण ब्राम्हणाचा । संग न सुटे शुद्रीचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पुराणीं पवाडे जयाचे अपार । ऐकतांचि फार सुख वाटे ॥१॥ भोळा महादेव पाहे भोंळा भाव । एकसरें जीव उद्ध-राया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुरुष अथवा नारी आलिया संसारीं । वाचे हरी हरी भलत्या भावें ॥१॥ सुफळ संसार एका रामनामें । वाउग्या त्या भ्रमें पतन घडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ