भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरुष अथवा नारी आलिया संसारीं । वाचे हरी हरी भलत्या भावें

purush athava nari aliya sansarin | vache hari hari bhalatya bhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुरुष अथवा नारी आलिया संसारीं । वाचे हरी हरी भलत्या भावें ॥१॥ सुफळ संसार एका रामनामें । वाउग्या त्या भ्रमें पतन घडे ॥२॥ जन्ममरणाचा तोडॊनियां फांसा । वेगीं हृषिकेशा भजा आधीं ॥३॥ एका जनार्दनीं किती हें सांगावें । गुंतलेती हावे वाउगें तें ॥४॥