भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरे जरी म्हणों तरी अमित पुरला

pure jari mhanon tari amit purala

पुरे जरी म्हणों तरी अमित पुरला । पुरोनिया उरला तेज:पुंज वो माय ॥१॥ ज्ञानाचे खाणीं माणिके निर्वाणी लाधले मी निर्गुणी निरालंब वो माय ॥२॥ आत्मवाचिया परी खेवणिलीं भूषणें । तें मी आवडीचें लेणें लेईलें वो माय ॥३॥ हा सुजडु जडला विटेसि लाधला । त्या रखुमादेविवरा विठ्ठला मी न्याहाळी वो माय ॥४॥