भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुन्हां पेहरंब्याच्या सुखें गे गाई हरिमुखें । वाजवुनी टाळी रंगीनाचोनी हरिखें

punhan peharambyachya sukhen ge gai harimukhen | vajavuni tali ranginachoni harikhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुन्हां पेहरंब्याच्या सुखें गे गाई हरिमुखें । वाजवुनी टाळी रंगीनाचोनी हरिखें ॥१॥ देईल तोचि पानें गे गौरवुनी मानें । खोबरियाच्या वाटया माळा गळांचीं सुमनें ॥२॥ उदार हा दानीं गे लोकीं त्रिभुवनीं । तोचि ध्याई चित्तीं आतां करिल सुखा धणी ॥३॥ निळा म्हणे सर्व खेळीं खेळा साक्षभूत । तोचि जंनी वनीं सये नांदे हदयांत ॥४॥