भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्यभूमी आळंकावती। प्रत्यक्ष नांदे कैलासपती। आणि सिद्ध साधकां वस्ती । ब्रह्मा अमरपती आदिकरुनी

punyabhumi alankavati| pratyaksha nande kailasapati| ani siddha sadhakan vasti | brahma amarapati adikaruni

रचनाकार: संत सेना · अभंग
पुण्यभूमी आळंकावती। प्रत्यक्ष नांदे कैलासपती। आणि सिद्ध साधकां वस्ती । ब्रह्मा अमरपती आदिकरुनी ॥ १॥ ऐका अळंकापुरीची मात । स्वयें वर्णीत श्रीभगवंत । उपमेसि न पुरे निश्चित । वैकुंठ आदिकरुनी ॥२॥ येथे तिन्ही मूर्ति अवतार । धरुनि करिती जगाचा उद्धार। मुळ अदि माया साचार । दही अवतार मुक्ताबाई ॥३॥ या चौघांचे स्मरणी । महापापा होय धुणी । येऊनि मुक्ती लागती चरणीं । ऐसें चक्रपाणी सांगत ॥४॥ नामया सांगे जगज्जीवन । या भूमीचें न करें वर्णन । सेना घाली लोटांगण। वंदी चरण ज्ञानदेवाचें ॥ ५॥