भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा पंढरीनाथा। शरण आलों कृपावंता

aga pandharinatha| sharan alon krupavanta

रचनाकार: संत सेना · अभंग
अगा पंढरीनाथा। शरण आलों कृपावंता ॥१॥ याचा धरी अभिमान । सत्य करवें वचन ॥२॥ गीता भागवतीं। स्वयें बोले रमापती ॥३॥ म्हणती दीनानाथ । हेंचि सांभाळीं कीं व्रत ॥४॥ मोकलिता दूरी। सेना न ठेविची उरी ॥५॥