भजनी मालिका
← भजनांकडे परत

अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा। तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं

anyayi aparadhi ladival santancha| tethen kalikalacha righ nahin

रचनाकार: संत सेना · अभंग
अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा। तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥१॥ समर्थाचे बाळ समर्थचि जाणें। वागवी अभिमान म्हणतां त्याचे ॥२॥ अन्यायाच्या राशी उदंड केल्या जरी। तरी क्षमा करी मायबापा ॥३॥ कल्पतरू छाया बैसला सेना न्हावी। दया ते वागवी बहु पोटीं ॥४॥