भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगिकार केला। भार चालवी विठ्ठला

angikar kela| bhar chalavi viththala

रचनाकार: संत सेना · अभंग
अंगिकार केला। भार चालवी विठ्ठला ॥१॥ संतीं सांगितलें । तें म्यां हृदयीं धरिलें ॥२॥ तारिला अजामिळ। महा पापी की चांडाळ ॥३॥ पतितपावन। करी नाम हे जतन ॥४॥ वागवी अभिमान । सेना न्हवी यातिहीन ॥५॥