भजनी मालिका
← भजनांकडे परत

अन्यायी अन्यायी। किती म्हणून सांगो काई

anyayi anyayi| kiti mhanun sango kai

रचनाकार: संत सेना · अभंग
अन्यायी अन्यायी। किती म्हणून सांगो काई।॥ १॥ तूं तो उदाराचा राणा। क्षमा करी नारायणा ॥२॥ काम क्रोध लोभ मोहो । नाडिलों याचेनि पहाहो ॥ ३॥ नावडे संतसंगती। नाहीं केली हरिभक्ती ॥४॥ निंदा केली भाविकांची । चित्तीं आस धनाची ॥५॥ सेना पायांचा पुतळा। तुज शरण जी दयाळा ॥६॥