भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुष्करिणीकांठीं वैष्णवांचे भार । देव ऋषीश्वर जेवताती

pushkarinikanthin vaishnavanche bhar | dev rushishvar jevatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुष्करिणीकांठीं वैष्णवांचे भार । देव ऋषीश्वर जेवताती ॥१॥ अवघिया पात्रें वाढलीं नारायणें । सोडिती पारणें निवृत्तिराज ॥२॥ विठोबा रखुमाईनें घेतला निवृत्ति । जेविताती पंक्ति गोपाळांच्या ॥३॥ जेवले वैष्णव आणि ह्रषिकेशी । गेले आचमनासी पुष्करिणीतें ॥४॥ अवघे संत तेथें बैसले निवाडे । पुंडलिक विडे वांटितसे ॥५॥ नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास । होतो कासाविस निवृत्तिराज ॥६॥