भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वी जो प्रल्हाद तोचि जाणा अंगद । तोचि उध्दव प्रसिध्द कृष्णावतारीं

purvi jo pralhad tochi jana angad | tochi udhdav prasidhda krushnavatarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूर्वी जो प्रल्हाद तोचि जाणा अंगद । तोचि उध्दव प्रसिध्द कृष्णावतारीं ॥१॥ कलीमाजीं जाणा नामदेव म्हणती । लडिवाळ श्रीपति लळा पाळी ॥२॥ तीर्थयात्रा सर्व केलासे उध्दार । सर्व त्याचा भार चालविला ॥३॥ लडिवाळ नामा विठ्ठलचरणीं । एका जनार्दनीं नमन त्यातें ॥४॥