भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वजज्मीं त्यानें साधियेला योग । कांहींसा वियोग झाला होता

purvajajmin tyanen sadhiyela yog | kanhinsa viyog jhala hota

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्वजज्मीं त्यानें साधियेला योग । कांहींसा वियोग झाला होता ॥१॥ कैसा नेटेपाटे उन्मखे फुटला बालपणीं त्याला ज्ञाम झालें ॥२॥ विरक्ती वोळगे पाइक होउनी । शांती पुढारुनी माळ घाली ॥३॥ शमदम अंकित पुढारले बळें । योग तो अढळ सदा तेथें ॥४॥ मान गर्व मनाचा खुटला विचार । थिता अहंकार तोहि गेला ॥५॥ नामा म्हणे बाळ बोलिलें जाणोनीं । माउली हांसोनी काय बोले ॥६॥