भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वी केली सेवा उपयोगा

purvi keli seva upayoga

पूर्वी केली सेवा उपयोगा । आली देवा दिले असते । जिवा आहूती लागी ॥१॥ अनंत जन्मीचे फळले । अनुष्ठान पाहिले चरण । विठोबाचे ॥२॥ न जाणो माझ्या । येतील पाठोपाठी घालतिल । मीठी भिडे तुला ॥३॥ त्यासी द्याल तुम्ही । अगत्य उदारा । मज कां न । मारा आपुले हाते ॥४॥ नामा म्हणे तुझे । न सोडी चरण युगा युगी । धरणे घेतले असे ॥५॥