भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड जयाला देवाचा शेजार

akhand jayala devacha shejar

अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाहीं गेला ॥१॥ मान अपमान वाढविसी हेवा ॥ दिवस असतां दिवा हातीं घेसी ॥२॥ परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ ॥ आंधळे पां डोळे कां वा जाले ॥३॥ कल्पतरुतळवटीं इच्छिली ते गोष्टी । अद्यापि नरोटी राहिली कां ॥४॥ घरीं कामधेनु ताक मागूं जाय । ऐसा द्वाड आहे जगामाजीं ॥५॥ म्हणे मुक्ताबाई जाई दरुषणा । आधीं अभिमाना दूर करा ॥६॥