भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वसंबंधें मज दिधलें बापानें शेखी काय जाणें कैसें जालें

purvasambandhen maj didhalen bapanen shekhi kay janen kaisen jalen

रचनाकार: संत लाडाई · अभंग
पूर्वसंबंधें मज दिधलें बापानें शेखी काय जाणें कैसें जालें ॥१॥ प्रमुतीलागी मज आणिलें कल्याणा। अंतरला राणा पंढरीचा ॥२॥ मुकुंदें मजशी थोर केला गोवा । लोटियलें भवनदीमाजी ॥३॥ ऐकिला वृत्तांत सर्व जालें गुम माझेंचि संचित खोटें कैसें ॥४॥ द्वादशबहात्तरी कृष्ण त्रयोदशी आषाढ हे मास देवद्वारीं ||५|| सर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठलीं मज कां ठेविलें पापिणीसी ॥६॥ लाडाई म्हणे देह अपन विठ्ठला । म्हणोनी आदरिला प्राणायाम ॥ ७ ॥