भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथाचा नाथ, दिनाचा दयाळ म्हणवोनी सांभाळ करी माझा

anathacha nath, dinacha dayal mhanavoni sambhal kari majha

रचनाकार: संत लाडाई · अभंग
अनाथाचा नाथ, दिनाचा दयाळ म्हणवोनी सांभाळ करी माझा ।।१।। तुजा ऐसा देवा नाही त्रिभुवनी । म्हणवोनी चरणी विनटले ।।२।। बापा विठ्ठलराया करी कृपादान सांभाळी वचन आपुले ते ।। ३।। लाडाईम्हणे देवा भेट देई वेगी । ब्रीद तुझे जगी दीननाथा ॥ ४ ॥