भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनिया पाणि करी विनवणी धांय चक्रपाणी पांडुरंगा

jodoniya pani kari vinavani dhany chakrapani panduranga

रचनाकार: संत लाडाई · अभंग
जोडोनिया पाणि करी विनवणी धांय चक्रपाणी पांडुरंगा।।१।। कोणा निरविले हे नाही कळले येई गे विठ्ठले मायबहिणी ||२|| ऐकोनियां धांवा धांवला अनंत शंख चक्रांकित उभा पुढे।।३।। उचलोनि मुकुंदा चाली योग सांभाळीला तुझा थी॥४॥ देव म्हणे तुझ्या पुर्वजांसी भाका दिवाली ऐक सांगतो मी ॥५॥ तुमची वंशावळी पोशीन मी सत्य। म्हणोनि कुर्वाळी पाद्य करा ॥६॥ येरी चरणावरी) ठेविला माथा | कृपाळू अनंता सांभाळावे । ॥७॥ ध्यानी धरोनिया मूर्ती सबाह्या अंतरी आता याउपरी न देखे कांही ॥८॥