भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वीं तुझी कांहीं केली होती सेवा । उपयोगा देवा आली आजी

purvin tujhi kanhin keli hoti seva | upayoga deva ali aji

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्वीं तुझी कांहीं केली होती सेवा । उपयोगा देवा आली आजी ॥१॥ अनंता जन्मींचें फळलें अनुष्ठान । पाहिले चरण विठो तुझे ॥२॥ न जाणों माझ्या येतील पाठोपाठीं । घालतील मोठी भीड तुज ॥३॥ त्यासी द्याल तुम्ही अगत्य उदारा । मातें कां न मारा आपुले हातें ॥४॥ नामा म्हणे तुझे न सोडी चरण । युगायुगींज धरणें घेतलें असे ॥५॥