भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल ते पंढरी पैल ते पंढरी । पांढरीवरी काळी वस-विली

pail te pandhari pail te pandhari | pandharivari kali vas-vili

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पैल ते पंढरी पैल ते पंढरी । पांढरीवरी काळी वस-विली ॥१॥ सोंवळें हें ब्रह्म सुनिळ हें ब्रह्म । विद्युल्लता ब्रह्म पाहूं चला ॥२॥ नामा ह्मणे माझा विठ्ठल हा डोळा । अर्धमात्रे जवळां पाहूं चला ॥३॥