भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठी एकें जैसे तैसे

praji to paik olicha naik | potasathi eken jaise taise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठी एकें जैसे तैसे ॥१॥ आगळें पाऊल आणिकांसी तारी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥ पाठीवरी घाय म्हणती फटमर । नीधडा अंग शूर मान पावे ॥२॥ घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥३॥ तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥४॥