भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा

prakruticha paitha kalpana majitha

प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा । न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥ १ ॥ अहिंसेचें स्वरूप हेंचि हरिरूप । न म्हणे हरि आप सर्व आहे ॥ २ ॥ नाहीं त्यांसि जय नुद्धरे सर्वथा । हरिवीण व्यथा कोण वारी ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये । तेणें मार्गें पाहे हरि सोपा ॥ ४ ॥