भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रणवाचे भेद उकलावें देहांत

pranavache bhed ukalaven dehant

प्रणवाचे भेद उकलावें देहांत । चंद्राची मी मात सांगतसें ॥१॥ सहस्त्र दळावरी तेज शुध्द असे । त्या तेजे प्रकाशे चंद्र बापा ॥२॥ उन्मनीचे ध्यासें सहस्त्रदळ गाजे । पश्चिम मार्गी बीजें दोन असती ॥३॥ लक्ष लावी ज्ञानदेव एकलाची । शुध्द ज्योती तोचि जाणे एक ॥४॥