भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रकृतीचें पूजन प्राप्तिविण जाण

prakrutichen pujan praptivin jan

प्रकृतीचें पूजन प्राप्तिविण जाण । प्राप्ति सिंचन दोन्हीं वायां गेलीं ॥१॥ पूजन कवणा करुं सिंचन कवणा करुं । नाहीं नव्हे तें धरुं गुरुमुखें ॥२॥ रखुमादेविवर गुरुमुखा भ्याला ॥ होता तो लपाला नाहीं ते ठाई ॥३॥