भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रकाश तरणी न बोले वेदवाणी । बोध विवेक दोन्ही तटस्थ झालीं

prakash tarani na bole vedavani | bodh vivek donhi tatastha jhalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रकाश तरणी न बोले वेदवाणी । बोध विवेक दोन्ही तटस्थ झालीं ॥१॥ वेदासी अगोचर ध्यानासी कानडें । तें ब्रह्मा सांपडें सदगुरु चरणीं ॥२॥ काळासी नाकळें कर्मीं जे न मिळें । सर्वांसी न कळे असुनियां ॥३॥ जीवीं जीवा न कळे शिवपण वोविलें । नाम या वेगळें सच्चिदनंद ॥४॥ सदगुरु बोधें ब्रह्मा ब्रह्मार्पण । जीवासी सोडवण सदगुरुचरणीं ॥५॥ गुरुजप सदा नाम एक वस्ती । एका जनार्दनीं प्राप्त सहज नाम ॥६॥