भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रताप तुमचा आहेचि जैसा । करितां जी तैसा बडिवारही

pratap tumacha ahechi jaisa | karitan ji taisa badivarahi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्रताप तुमचा आहेचि जैसा । करितां जी तैसा बडिवारही ॥१॥ नव्हे जें कोणा तें करुनी दावितां । अघटित घडवितां निमिष्यमात्रे ॥२॥ स्त्रियांचे पुरुष पशुमुखें श्रुती । चालविल्या भिंती उदकीं वह्या ॥३॥ निळा म्हणे माझा करा अंगिकार । तरी महिमा थोर वाढेल तुमचा ॥४॥