भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज

prapanchachi vasti vyartha kahya kaj

प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज । आम्हा बोलतां लाज येतसये ॥ १ ॥ काय करूं हरि कैसा हा गवसे । चंद्र सूर्य अवसे एकसूत्र ॥ २ ॥ तैसें करूं मन निरंतर ध्यान । उन्मनि साधन आम्हां पुरे ॥ ३ ॥ निवृत्ति परिपाठ हरिनाम हेचि वाट । प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥ ४ ॥