भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रभातेसी उठोनी । स्नान करिती अनुदिनीं । विठ्ठल दरुशनीं । प्राणी मुक्त संसार

prabhatesi uthoni | snan kariti anudinin | viththal darushanin | prani mukta sansar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रभातेसी उठोनी । स्नान करिती अनुदिनीं । विठ्ठल दरुशनीं । प्राणी मुक्त संसार ॥१॥ धन्य पंढरीचा वास । सुख मिळे अविनाश । कुळीं वैष्णव निःशेष । रामकृष्ण उच्चार ॥२॥ करें नेमें एकादशे । जाय नेमें पंढरीसी । ऐसें या तीर्थासी नेमे करितां जोडें ॥३॥ सर्व पर्वकाळ घडे । कोटी अश्वमेध जोडे । पुण्य ते उघडें । विठठल रुपडे पाहतां ॥४॥ ऐसा जया नेमधर्म । न चुके वाचा नामस्मरण । एका जनार्दनीं स्मरण । विठ्ठलदेवी आवडी ॥५॥