भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रत्यक्ष पहा रे जाऊन । विटेवरी ठेविले चरण

pratyaksha paha re jaun | vitevari thevile charan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रत्यक्ष पहा रे जाऊन । विटेवरी ठेविले चरण ॥१॥ रुप सुंदर गोजिरें । कानीं कुंडलें मकराकारें ॥२॥ पुढें शोभे चंद्रभागा । मध्यें पुंडलीके उभा ॥३॥ ऐसें उत्तम हे स्थळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥४॥ तया ठायीं भेद नुरे । एका जनार्दनीं झुरे ॥५॥