भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रत्यक्ष्‍ भानुदासाचें कुळीं । स्वयें वनमाळी अवतरले

pratyaksh‍ bhanudasachen kulin | svayen vanamali avatarale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्रत्यक्ष्‍ भानुदासाचें कुळीं । स्वयें वनमाळी अवतरले ॥१॥ भक्तीमार्ग लोपे अधर्म संचला । कली उदय झाला प्रथम चरण ॥२॥ नानापरी जन वर्ततसे सैरा । न भें व्यभिचारा नारी नर ॥३॥ निळा म्हणे इहीं अवतार केले । जग उध्दरिलें महादोषी ॥४॥